Gandharva Music Exam Result | उरुळी कांचनच्या साने संगीत क्लासेसचा 98% निकाल; गंधर्व संगीत परीक्षेत विद्यार्थ्यांचा दमदार यशोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gandharva Music Exam Result उरुळी कांचन | साक्षीदार न्यूज | भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसने 98 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ काल दुपारी साने संगीत क्लासेस, उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडला.

- Advertisement -

या यशामागे सर्व वाद्यांमध्ये पारंगत असणारे श्री शिवराज साने सर यांचे मार्गदर्शन व परिश्रम महत्त्वाचे ठरले. क्लासेसच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, आकाशवाणी व दूरदर्शनवरील विद्यार्थी सहभाग, समाजप्रबोधन, जनजागृती पथनाट्ये यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.

डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या गंधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षेत क्लासेसचा 98% निकाल लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

पारितोषिक वितरण समारंभात जेष्ठ पत्रकार श्री सहदेव खंडागळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. डॉ. श्री रविंद्र भोळे, कवी व इतिहास संशोधक श्री खलील शेख, पत्रकार सौ सुवर्णाताई कांचन, सोरतापवाडी गावाचे उद्योजक व पत्रकार श्री बापूसाहेब चौधरी, श्री अमोल भोसले, श्री तुपे उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थी संस्कृती अंधारे, वैष्णवी साळुंखे, रणक खरात, वेदांत गायकवाड, संकेत खंडागळे, श्रेयस गायकवाड, रुद्र जाधव, आरोही साळुंखे, यशराज साळुंखे, ऋतुजा आवळे, रियान गाडीलकर, सुयश घनवट, ओमकार कुंजीर, श्रेयस माने, समर्थ मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराज साने सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री रोहिदास बिचकुले यांनी केले, तर आभार जेष्ठ पत्रकार श्री अमोल भोसले यांनी मानले.

 राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

👉 “रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Gandharva Music Exam Result

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jain Irrigation | जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

Jain Irrigation | जळगाव | येथे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचनमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष!...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचन | येथे साने संगीत क्लासेस व साने कला मंचाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात...

Dr Babasaheb Ambedkar | जय भीमच्या घोषणांनी दणाणलं साकळी!...

Dr Babasaheb Ambedkar | यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील साकळी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत...

RECENT