Jain Irrigation | जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jain Irrigation | जळगाव | येथे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अग्निशमन यंत्रणा व उपकरणांचे पूजन करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. १४ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या अग्निशमन सेवा सप्ताहाची मुख्य संकल्पना ‘सुरक्षित विद्यालय, सुरक्षित रुग्णालय आणि अग्नि सुरक्षेबाबत जागरूक समाज: आग प्रतिबंधासाठी एकत्र’ अशी आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळा व रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा बळकट करणे आणि नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.

- Advertisement -

या निमित्ताने शाळा व रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा अद्ययावत ठेवणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करणे तसेच नियमित मॉक ड्रिल आयोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय कंपनीतील सहकाऱ्यांना आग लागल्यास कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.अग्निसुरक्षा ही केवळ अग्निशमन दलाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, ही भावना रुजवण्यासाठी सहकाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. मुंबई डॉकयार्ड स्फोट (१९४४) मध्ये शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ हा सप्ताह साजरा केला जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जैन फूड पार्क, जैन हिल्स, जैन व्हॅली आणि जैन एनर्जी पार्क येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जैन व्हॅली येथे १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमात वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, रोशन शहा, संजय पारस, जी. आर. पाटील, वाय. जे. पाटील, तुकाराम बुधवंत तसेच फायर सेफ्टी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्लास्टिक पार्क येथे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अग्निशमन यंत्रणा पूजन कार्यक्रमास वरिष्ठ सहकारी जे. एस. जैन, सी. एस. नाईक, डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. योगेश बाफना, शुभम शुक्ला, अभिजीत पवार आणि फायरमन उपस्थित होते.अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Jain Irrigation

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचनमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष!...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचन | येथे साने संगीत क्लासेस व साने कला मंचाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात...

Dr Babasaheb Ambedkar | जय भीमच्या घोषणांनी दणाणलं साकळी!...

Dr Babasaheb Ambedkar | यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील साकळी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत...

Judiciary India | बालविवाहावर कडक कारवाईचा इशारा! साकळीतील विधी...

Judiciary India | यावल | मिलिंद जंजाळे |  तालुक्यातील साकळी येथे विधी जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. दि. १५ रोजी यावल तालुका विधी सेवा...

RECENT