Jalgaon ZP Health Department Scam | जळगाव जिल्हा परिषदेत आरोग्य भरतीचा मोठा घोटाळा? गुणवत्ता यादी न लावताच नियमबाह्य नियुक्त्या; बड्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon ZP Health Department Scam जळगाव | सुनिल भोळे | १५ वा वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व “हिंदू ऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजनेतील आरोग्य सेवक (MPW – Male) तसेच परिचारिका (Staff Nurse Male/Female) पदभरती प्रक्रियेवर गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. जाहिरातीत नमूद अटी-शर्तींचे उल्लंघन करत मेरिट (गुणांकन) यादी जाहीर न करता नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

या संदर्भात अभ्यासक शासकीय आरोग्य यंत्रणा व योजना दिनेश कडू भोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार सादर केली आहे. त्यांच्या मते, भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून नियमबाह्य पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, ४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम, प्रक्रिया व तपशील नमूद करण्यात आलेला नव्हता. तसेच काही पदांसाठी आरक्षणाचा तपशील अपूर्ण असल्याचेही निदर्शनास आले आहे. जाहिरातीत नमूद अटीनुसार उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करून मेरिट यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. दरम्यान, पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करून हरकती मागविण्यात आल्या, मात्र त्यानंतरही अंतिम मेरिट लिस्ट जाहीर न करता थेट निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर निवड समितीतील सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्याही नसल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात झालेल्या चर्चांमध्ये काही अधिकाऱ्यांनीही मेरिट यादी प्रसिद्ध न करता नियुक्त्या देण्यात आल्याचे मान्य केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तसेच, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या भरती प्रक्रियेत मेरिट यादी जाहीर केल्याचे दिसून येत असताना, जळगाव जिल्ह्यात ही प्रक्रिया न पाळल्याचेही निदर्शनास आले आहे. तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, ही भरती प्रक्रिया हेतुपुरस्सर विलंबाने राबविण्यात आली असून उमेदवारांकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही उमेदवारांकडून मोठ्या रकमेचे व्यवहार करून निवड यादीत समावेश केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापटे तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पंकज शिंपी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तक्रारदारांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करून ती तात्काळ रद्द करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी तसेच दोषींना निलंबित किंवा बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.

Jalgaon ZP Health Department Scam

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Satyajit Nemane ACB Trap | तलाठी नेमाणे प्रकरणात मोठा...

Satyajit Nemane ACB Trap | जळगाव | सुनिल भोळे | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत अडकलेले तलाठी सत्यजित अशोक नेमाणे यांच्या प्रकरणात मोठा न्यायालयीन उलटफेर...

Kingaon PHC Ambulance | किनगाव PHC मध्ये रुग्णवाहिका बंदच!...

Kingaon PHC Ambulance | किनगाव |मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ अशा घोषणा देत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभारामुळे किनगाव प्राथमिक...

Revenue Department | किंनगावात “महाराजस्व समाधान शिबीर”चा जल्लोष! शेकडो...

Revenue Department किंनगाव | मिलिंद जंजाळे | महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या गतिमान प्रशासन...

RECENT