Satyajit Nemane ACB Trap | तलाठी नेमाणे प्रकरणात मोठा उलटफेर! उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Satyajit Nemane ACB Trap | जळगाव | सुनिल भोळे | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत अडकलेले तलाठी सत्यजित अशोक नेमाणे यांच्या प्रकरणात मोठा न्यायालयीन उलटफेर झाला आहे. जळगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावलेल्या नेमाणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा देत सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे.सत्यजित नेमाणे यांच्यावर सातबारा उताऱ्यातील नावे कमी करून देण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. या प्रकरणी १७ फेब्रुवारी २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंप्राळा तलाठी कार्यालयात सापळा रचून नेमाणे यांना रंगेहाथ अटक केली होती. या कारवाईत सेवानिवृत्त कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे यांनाही अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

या प्रकरणात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात झाली. तक्रारदार, पंच साक्षीदार गणेश आडे, तपास अधिकारी पराग सोनवणे तसेच तत्कालीन प्रांताधिकारी अभिजित भांडे-पाटील यांच्या साक्षींवर आधारित निर्णय देताना न्यायालयाने नेमाणे यांना दोषी ठरवले होते. त्यानुसार त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ३ ते ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला होता. तर या प्रकरणात उखर्डू पांडू सोनवणे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सत्यजित नेमाणे यांनी ‘क्रिमिनल अपील ५४१/२०१८’ द्वारे उच्च न्यायालयात दाद मागितली. या अपीलावर न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत नेमाणे यांना सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नेमाणे यांचे जामीन रोखे व हमीपत्र रद्द करण्यात आले असून त्यांनी भरलेला दंड अपील कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात अपीलाकर्त्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील एन. बी. खंदारे आणि अंशुमन देशमुख (अतुल एम. पवार यांच्यामार्फत) यांनी युक्तिवाद केला, तर शासनाच्या वतीने ए.पी.पी. अनुराधा एस. मंत्री यांनी बाजू मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा देणाऱ्या सत्यजित नेमाणे यांच्यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण ठरला असून, त्यांच्या सेवेत पुनरागमनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Satyajit Nemane ACB Trap

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon ZP Health Department Scam | जळगाव जिल्हा परिषदेत...

Jalgaon ZP Health Department Scam जळगाव | सुनिल भोळे | १५ वा वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व “हिंदू ऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला...

Kingaon PHC Ambulance | किनगाव PHC मध्ये रुग्णवाहिका बंदच!...

Kingaon PHC Ambulance | किनगाव |मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ अशा घोषणा देत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभारामुळे किनगाव प्राथमिक...

Revenue Department | किंनगावात “महाराजस्व समाधान शिबीर”चा जल्लोष! शेकडो...

Revenue Department किंनगाव | मिलिंद जंजाळे | महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या गतिमान प्रशासन...

RECENT