JCL T20 2026 | जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल! शहरात भव्य रॅलीने रंगला T-20 थरार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

JCL T20 2026 | जळगाव | साक्षीदार न्यूज | जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित तसेच अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली होणाऱ्या ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ (JCL T-20) स्पर्धेचा बिगुल वाजला असून, शहरात भव्य रॅलीद्वारे स्पर्धेची रंगतदार सुरुवात करण्यात आली.

- Advertisement -

१८ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रिम स्पेसेस (मेहरूण तलावाजवळ) येथे ही स्पर्धा रंगणार असून, सहा संघांमध्ये क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीत संघ मालक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला. काव्यरत्नावली चौक येथून सुरू झालेल्या या रॅलीला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, दाल परिवारचे अतुल कोगटा, एस. के. ट्रान्सलाईनचे प्रणव कोठारी, सातपुडा आटोमोबाईलचे किरण बच्छाव, सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा, एम. व्ही. जे. इंडस्ट्रियल कन्सल्टंटचे सीए महावीर जैन, विमल जैन, खलिल बनवट, सागर पार्क क्लबचे सहकारी, अनिल कांकरिया, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, अॅड. सुरज जहॉंगिर यांनी हिरवी झेंडी दाखवली.

रॅलीने शहरातील विविध मार्गांवरून फेरी मारली. काव्यरत्नावली चौकातून निघालेली ही रॅली कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौक येथे दाखल झाली. रॅलीनंतर मान्यवरांच्या हस्ते सहा संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यामध्ये जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांचा समावेश आहे.

- Advertisement -

“आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा… खेळाची ताकद दाखविण्याचा, जळगावची शान उंचाविण्याचा” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. विविध संघांचे फ्लॅग आणि जर्सी परिधान करून सहभागी झालेल्या खेळाडूंनी जळगावकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेमुळे शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॅली यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तसेच रविंद्र धर्माधिकारी, समिर गुळवे, हितेंद्र पटेल, प्रशांत विरकर, वरुण देशपांडे, जगदीश चावला, मोहम्मद फजल, उदय सोनवणे, युवाशक्तीचे विराज कावडिया आणि इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

JCL T20 2026

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

hindu janjagruti | नाशिक प्रकरणावर कारवाईची मागणी; हिंदु जनजागृती...

hindu janjagruti | जळगाव | साक्षीदार न्यूज | नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत उघडकीस आलेल्या महिला छळाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव...

Jain Irrigation | जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

Jain Irrigation | जळगाव | येथे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचनमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष!...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचन | येथे साने संगीत क्लासेस व साने कला मंचाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात...

RECENT