hindu janjagruti | नाशिक प्रकरणावर कारवाईची मागणी; हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

hindu janjagruti | जळगाव | साक्षीदार न्यूज | नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत उघडकीस आलेल्या महिला छळाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे अत्याचार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, या घटनेची सर्वंकष तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणाकडे केवळ वैयक्तिक गुन्हा म्हणून न पाहता, त्यामागील संभाव्य संघटित बाबींचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रसिद्ध वृत्तांनुसार या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या अनुषंगाने विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले असल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.

- Advertisement -

समितीने आपल्या निवेदनात कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या POSH Act 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली आहे. तसेच संबंधित कंपनीत अंतर्गत तक्रार समिती (ICC) कार्यरत होती का, आणि तक्रारींवर योग्य कारवाई का झाली नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय भारतीय न्याय संहितेतील विविध कलमानुसार गुन्ह्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित महिलांना कायदेशीर मदत, समुपदेशन व सुरक्षा पुरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल नोंदी आणि इतर पुरावे जतन करण्याचे आदेश द्यावेत, तसेच राज्यातील इतर आयटी व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिला सुरक्षा आणि कार्यस्थळावरील सुरक्षिततेचे विशेष ऑडिट करावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित प्रकरणाची चौकशी व्यापक पातळीवर करून त्यामागील सर्व पैलू समोर आणणे आवश्यक आहे.

निवेदन देताना निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्याकडे समितीच्या प्रतिनिधींनी आपली मागणी मांडली. यावेळी कु. सायली पाटील, कु. गायत्री बारी, सौ. स्वाती काकडे, सौ. अनिता पोळ, श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री. विनोद शिंदे, श्री. भूषण पाटील, कु. धनश्री दहिवदकर, कु. वैष्णवी दैवज्ञ तसेच श्री. प्रशांत जुवेकर (उत्तर महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती) उपस्थित होते.

hindu janjagruti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

JCL T20 2026 | जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल! शहरात...

JCL T20 2026 | जळगाव | साक्षीदार न्यूज | जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित तसेच अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली...

Jain Irrigation | जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

Jain Irrigation | जळगाव | येथे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचनमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष!...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचन | येथे साने संगीत क्लासेस व साने कला मंचाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात...

RECENT